अर्थ मंत्रालय
"सर्वांसोबत वाटचाल" मंत्राची 2014 पासून सर्वसमावेशक विकासात परिणती
Posted On:
01 FEB 2023 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2023
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करताना 2014 पासून देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकत, केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी "सर्वांसोबत वाटचाल" या मंत्राद्वारे देशाचा सर्वसमावेशक विकास झाला यावर भर दिला. यामुळे सर्व नागरिकांसाठी दर्जेदार राहणीमान आणि सन्मानाचे जीवन सुनिश्चित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
वर्ष 2014 पासून सरकारच्या असंख्य कामगिरींची मोजदाद करताना, दरडोई उत्पन्न दुपटीहून अधिक होऊन 1.97 लाख रुपये झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याशिवाय, गेल्या नऊ 9 वर्षांत, जगातील बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून 5 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. "आम्ही एक सुशासित आणि नाविन्यपूर्ण देश म्हणून आमची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे ज्याने व्यवसायासाठी अनुकूल वातावरण अनेक जागतिक निर्देशांकांमध्ये दिसून येते आणि अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे," त्यांनी नमूद केले.
अर्थव्यवस्था अधिक औपचारिक झाली आहे हे नमूद करून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की ईपीएफओ सदस्यसंख्या दुपटीहून अधिक म्हणजे 27 कोटी झाली आहे. याव्यतिरिक्त, 2022 मध्ये युपीआय द्वारे 126 लाख कोटी रुपयांची 7,400 कोटी डिजिटल पेमेंट करण्यात आली.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2014 पासून देशभरात परिणामकारक सर्वसमावेशक विकासासाठी, लक्ष्यित लाभांच्या सार्वत्रिकीकरणासह अनेक योजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीला श्रेय दिले.
काही उल्लेखनीय कामगिरींमध्ये समाविष्ट असलेल्या कामगिरी अशा:
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालये,
- उज्ज्वला अंतर्गत 9.6 कोटी एलपीजी कनेक्शन,
- 102 कोटी लोकांचे 220 कोटी कोविड प्रतिबंधक लसीकरण,
- 47.8 कोटी पीएम जन धन बँक खाती,
- पीएम सुरक्षा विमा आणि पीएम जीवन ज्योती योजनेअंतर्गत 44.6 कोटी लोकांना विमा संरक्षण, आणि
- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 11.4 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2.2 लाख कोटी रुपयांचे रोख हस्तांतरण
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1895429)