अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आर्थिक सर्वेक्षण 2022-23 हे कोविड दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनात स्वयंसहायता गटांचे योगदान अधोरेखित करते


स्वयंसहायता गटांद्वारे मास्कचे उत्पादन हे दुर्गम ग्रामीण भागातील समुदायांना मास्कची उपलब्धता आणि वापर सक्षम करते

आपत्ती काळात बचत गटांनी दाखवलेली तत्परता आणि लवचिकता यात दूरगामी ग्रामीण परिवर्तनासाठी सातत्यता आवश्यक, सर्वेक्षणाची शिफारस

Posted On: 31 JAN 2023 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2023

 

महामारीच्या काळाने स्वयंसहायता गटातील (SHG) अर्थात बचत गटातील महिलांना संघटित करण्यासाठी, त्यांच्या समुहापलिकडे त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनात एकत्रितपणे योगदान देण्यासाठी एक संधी म्हणून काम केले. हे गट आपत्ती व्यवस्थापनातील आधारस्तंभ म्हणून उदयास आले, ते मास्क (आसाममधील गामुसा मास्क सारख्या सांस्कृतिक रूपांसह), सॅनिटायझर्स आणि संरक्षणात्मक उपकरणांचे उत्पादन करण्यात, महामारी विषयी जागरूकता निर्माण (उदा. झारखंडच्या पत्रकार दीदी) करण्यात, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा (उदा. केरळमधील फ्लोटिंग सुपरमार्केट) करण्यात, सामुदायिक किचन चालवण्यात (उदा. उत्तर प्रदेशातील प्रेरणा कॅन्टीन), शेतीच्या उपजीविकेला आधार देण्यात (उदा. पशु आरोग्य सेवांसाठी पशु सखी, झारखंडमधील भाजीपाल्याची ऑनलाइन विक्री आणि वितरण यंत्रणा आजीविका फार्म फ्रेश ), मनरेगा मध्ये अभिसरणात (उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड मध्ये), आणि आर्थिक सेवांच्या वितरणात (उदा. कोविड-रिलीफ डीबीटी रोख हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी बँक सखी द्वारे बँकेतील गर्दी टाळण्याचे व्यवस्थापन) आघाडीवर असल्याची नोंद आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मध्ये आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बचत गटांद्वारे मास्कचे उत्पादन हे एक उल्लेखनीय योगदान आहे, ज्यामुळे दुर्गम ग्रामीण भागातील समुदायांना मास्कची उपलब्धता आणि वापर करणे सुलभ झाले आणि कोविड-19 विषाणूविरूद्ध महत्त्वपूर्ण संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. 4 जानेवारी 2023 पर्यंत, दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत बचत गटांद्वारे 16.9 कोटी पेक्षा जास्त मास्क तयार करण्यात आले.

 

बचत गटांसाठी सरकारचे कोविड-19 पॅकेज

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) अंतर्गत, महिला बचत गटांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून दुप्पट करत 20 लाख रुपये करण्यात आली आहे. याचा फायदा 63 लाख बचत गट आणि 6.85 कोटी कुटुंबांना होण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) ने कोविड हॉटस्पॉट क्षेत्र आणि असुरक्षित गटांसाठी ग्राम संस्थांना (VOs) 1.5 लाख रुपयांचा अतिरिक्त असुरक्षितता न्यूनतम निधी ला मंजुरी दिली आहे.

 

पुढील वाटचाल

शेवटच्या टप्प्यापर्यंतची उपलब्धता, समुदायांचा विश्वास आणि ऐक्य मिळवण्याची क्षमता, स्थानिक गतिशीलतेचे ज्ञान आणि सदस्यांच्या आर्थिक एकत्रीकरणाद्वारे साधी उत्पादने आणि सेवा त्वरीत तयार करण्याची क्षमता यामुळे स्वयंसहायता बचत गट सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सुयोग्य आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवाल अशी शिफारस करतो की कोविडसह आपत्ती काळात बचत गटांनी दाखवलेली तत्परता आणि लवचिकता यात दूरगामी ग्रामीण परिवर्तनासाठी सातत्यता आवश्यक आहे. यामध्ये, इतर गोष्टींबरोबरच, स्वयंसहायता बचत गटांच्या चळवळीच्या व्यापकतेमध्ये आंतर-प्रादेशिक असमानतेचे निराकरण करणे, बचत गट सदस्यांना सूक्ष्म-उद्योजकांमध्ये सामील करणे, उत्पादने आणि सेवांमधील मूल्य शृंखला पुढे जाण्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या संदर्भित कौशल्य विकास आणि बचत गट छत्र अंतर्गत कमीत कमी विशेषाधिकार प्राप्त करणे अंतर्भूत आहे.

 

* * *

U.Ujgare/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1894987) Visitor Counter : 109