पंतप्रधान कार्यालय

रोजगार मेळ्या अंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान 20 जानेवारी रोजी नियुक्तीपत्रांचे वितरण करणार

Posted On: 19 JAN 2023 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023

 

रोजगार मेळ्या अंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 71,000 जणांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नवनियुक्तांना संबोधितही करणार आहेत.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने रोजगार मेळा हे एक पाऊल आहे. रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल.

देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त, भारत सरकारच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंते, लोको पायलट, तंत्रज्ञ, उप निरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर, सामाजिक सुरक्षा अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहू-उद्देशीय स्टाफ - एमटीएस, अशा विविध स्थानांवर /पदांवर रुजू होतील

अलीकडेच नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे, कर्मयोगी प्रारंभ मोड्युल मधून शिकण्यासंबंधीचे अनुभव देखील रोजगार मेळाव्यात होणाऱ्या कार्यक्रमात कथन केले जातील. कर्मयोगी प्रारंभ मोड्यूल म्हणजे विविध सरकारी विभागांतील नवनियुक्तांसाठी ऑनलाईन अभिमुखता (दिशानिर्देश) अभ्यासक्रम आहे.

 

 

 

 

 

 

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1892210) Visitor Counter : 247