पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 15 जानेवारी रोजी सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2023 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.
भारतीय रेल्वेकडून सेवेत दाखल होणारी ही आठवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली गाडी असून सुमारे 700 किमी अंतर पार करेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबेल.
स्वदेशात निर्मिती करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना जलद, आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देईल.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1891069)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam