पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून (PMNRF) मदत जाहीर

प्रविष्टि तिथि: 13 JAN 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून मदत देखील जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल दु:ख झाले. शोकाकूल कुटुंबीयांप्रति संवेदना. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात.  मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून(PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल : पंतप्रधान मोदी"

 

 

* * *

S.Patil/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1890989) आगंतुक पटल : 426
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam