पंतप्रधान कार्यालय
डिसेंबर 2022 मध्ये 12.8 लाख कोटी रुपयांचे 782 कोटी यूपीआय व्यवहार पूर्ण करून भारताने महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर, पंतप्रधानांनी यूपीआय पेमेंट पद्धतीच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत आनंद व्यक्त केला
डिजिटल व्यवहारांचा स्वीकार केल्याबद्दल सहकारी भारतीयांचे केले कौतुक
Posted On:
02 JAN 2023 9:31PM by PIB Mumbai
डिसेंबर महिन्यात 12.8 लाख कोटी रुपयांचे 782 कोटी यूपीआय व्यवहार पूर्ण करून भारताने महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर, डिजिटल आर्थिक व्यवहारांचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर केल्याबद्दल भारतीय नागरिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
अर्थक्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक तज्ञाचा ट्विट संदेश सामायिक करून,पंतप्रधान त्यांच्या ट्विट संदेशात म्हणाले;
“तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने भारतात यूपीआय प्रणालीला वाढत्या प्रमाणात लोकप्रिय केले आहे ते मला फार भावले. डिजिटल भरणा पद्धतीचा स्वीकार केल्याबद्दल मी माझ्या सहकारी भारतीयांचे कौतुक करतो. तंत्रज्ञान आणि अभिनव संशोधनाप्रति त्यांनी उल्लेखनीय स्वीकारार्हता दाखवली आहे.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1888167)
Visitor Counter : 252
Read this release in:
Kannada
,
Tamil
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam