पंतप्रधान कार्यालय
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (IndAus ECTA) अंमलात येत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
29 DEC 2022 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (IndAus ECTA) आजपासून अंमलात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी हा महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीस यांच्या ट्विटर संदेशाला प्रतिसाद म्हणून दिलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “इंडऑस ईसीटीए आजपासून अंमलात येत असल्याबद्दल आनंदित आहे. आपल्या धोरणात्मक भागीदारीसाठी हा महत्त्वपूर्ण क्षण आहे. यामुळे आपल्यातील व्यापार आणि आर्थिक बंध मजबूत करण्यास वाव निर्माण झाला असून द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे. तुमचे लवकरच भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहे.”
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887409)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam