पंतप्रधान कार्यालय
राजस्थानधील जोधपूर इथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटातल्या पीडितांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून सानुग्रह मदत देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Posted On:
16 DEC 2022 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानधील जोधपूर इथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटातल्या पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून सानुग्रह मदत जाहीर केली आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या निकटच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर या दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवरून दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाचा ट्विटर संदेश;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील जोधपूर इथे झालेल्या भीषण गॅस सिलेंडर दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या निकटच्या वारसाला राष्ट्रीय मदतनिधीतून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884282)
Visitor Counter : 169
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam