पंतप्रधान कार्यालय

प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक वायके अलघ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 06 DEC 2022 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक वायके अलघ यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;

"प्राध्यापक वायके अलघ हे एक ख्यातनाम विद्वान होते, सार्वजनिक धोरणाच्या विशेषतः  ग्रामीण विकास, पर्यावरण आणि अर्थशास्त्र या पैलूंचा त्यांना विशेष  ध्यास होता. त्यांच्या निधनाचे वृत्त  दुःखद आहे . त्यांच्या बरोबर केलेल्या संवादाच्या स्मृती कायम राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या दुःखात  मी सहभागी आहे, ओम शांती. 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1881272) Visitor Counter : 142