पंतप्रधान कार्यालय
परीक्षा पे चर्चा 2023 या कार्यक्रमाशी निगडित उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना केले आमंत्रित
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2022 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022
परीक्षा पे चर्चा 2023 या कार्यक्रमाशी निगडित रोचक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आमंत्रित केले आहे. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करायची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या एका ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.
“परीक्षा पे चर्चा 2023 या कार्यक्रमासाठी मी परीक्षा योद्ध्यांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना रंजक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करतो. आपल्या विद्यार्थ्यांसाठी तणावरहीत वातावरण तयार करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करूया. #परीक्षा पे चर्चा 2023”
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1880026)
आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Malayalam