पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माता मृत्यू दरात झालेल्या लक्षणीय घसरणीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले समाधान

प्रविष्टि तिथि: 30 NOV 2022 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

देशातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे. 2014-16 या काळात , प्रती एक लाख मातांमागे, 130 इतका असलेला हा मृत्यूदर 2018-20 मध्ये 97 प्रती लाखांपर्यंत कमी झाला आहे. याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संबंधितांचे आभार मानत, आनंद व्यक्त केला आहे. महिला सक्षमीकरणाशी संबंधित, सर्व पैलू अत्यंत मजबूत केले जात  आहेत,असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडवीय यांचे ट्वीट शेअर करत पंतप्रधानांनी म्हटलं आहे, की—

हा फार उत्साहवर्धक कल आहे. हा बदल बघून फार समाधान वाटले. महिला सक्षमीकरणाशी संबंधित सर्व पैलू अधिकाधिक बळकट करण्यावर आम्ही भर  घेत आहोत  

 

 

 

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1880013) आगंतुक पटल : 263
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam