पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -20 शिखर परिषदेदरम्यान बाली येथे जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
Posted On:
16 NOV 2022 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाली येथे जी-20 शिखर परिषदेच्या दरम्यान आज जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष ओलाफ शोल्झ यांची भेट घेतली. उभय नेत्यांची आज झालेली भेट ही उभय नत्यांंची ही तिसऱी भेट आहे; याआधी सहाव्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लागार बैठकीसाठी पंतप्रधान मोदी बर्लिन येथे गेले असताना ते जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष ओलाफ शोल्झ यांना भेटले आणि त्यानंतर शोल्झ यांच्या निमंत्रणाला मान देत, जी-7 शिखर परिषदेतील सदस्य राष्ट्र म्हणून पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीतील स्क्लोस एल्माऊला भेट दिली तेव्हा उभय नेते भेटले होते.
आजच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत श्रेणीबाबत चर्चा केली. आंतर-सरकारी सल्लागार बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ओलाफ शोल्झ यांनी हरित तसेच शाश्वत विकासाबाबतच्या भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे आता या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या भागीदारी संबंधांचा नवा टप्पा सुरु झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापार तसेच गुंतवणूक विषयक बंध अधिक दृढ करण्यावर आणि संरक्षण दले आणि सुरक्षा, स्थलांतर आणि प्रवाससेवा तसेच पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढविण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
जी-20 आणि संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर परस्परांशी सहकार्य आणि समन्वय वाढविण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1876438)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam