पंतप्रधान कार्यालय
जी-20 शिखर परिषदेच्या निमित्त दौ-यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाली येथील खारफुटीच्या जंगलांना दिली भेट
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2022 10:12AM by PIB Mumbai
नवी दिल्ली – दि. 16 नोव्हेंबर, 2022
बाली इथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्त विविध देशांचे प्रमुख आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर देशांच्या प्रमुखांनी बालीमधील ‘तमन हुतन राया न्गुरह राय’ खारफुटीच्या जंगलाला आज भेट देवून तिथे वृक्षारोपण केले.
वैश्विक संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये खारफुटी महत्वाची भूमिका बजावते. इंडोनेशियाच्या G-20 अध्यक्षतेखाली इंडोनेशिया आणि UAE चा संयुक्त उपक्रम असलेल्या मॅन्ग्रोव्ह अलायन्स फॉर क्लायमेट (MAC) मध्ये भारत सामील झाला आहे. या ‘एमएसी’ म्हणजेच ‘मॅनग्रोव्ह अलायन्स फॉर क्लायमेट’ या आघाडीमध्ये आता भारतही सहभागी झाला आहे.
भारतामध्ये 5000 चौरस किलोमीटर परिसरात खारफुटीच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. खारफुटीमुळे जैवविविधतेने समृद्ध स्थाने निर्माण होतात आणि प्रभावी ‘कार्बन सिंक’ म्हणूनही खारफुटी काम करते. यामुळे खारफुटीच्या संरक्षणाचे आणि त्यांचे पुनर्संचय करण्यावर भारत भर देत आहे.
***
Sonal .T/Suvarna B/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1876352)
आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam