पंतप्रधान कार्यालय
काशी तमिळ संगम कार्यक्रमाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला उत्साह
Posted On:
09 NOV 2022 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी-तमिळ संगमाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. काशी तमिळ संगम, भारताच्या उत्तर आणि दक्षिण प्रदेशातील कालातीत बंध व्यक्त करणारा हा उत्सव आहे. हा संगम म्हणजे, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा उत्सव आहे. हा उत्सव, तमिळ भाषा आणि संस्कृतीचे सौन्दर्य साजरा करणारा आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे ट्वीट शेअर करत, पंतप्रधान म्हणाले;
“काशी-तमिळ संगम कार्यक्रमाबद्दल मी स्वतः उत्साही आहे. हा उत्सव म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचा उत्सव आहे तसेच तो तमिळ भाषा आणि संस्कृतीचाही उत्सव आहे.”
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874842)
Visitor Counter : 163
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam