पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंड दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या राज्याच्या जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 NOV 2022 10:03AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, दि. 9 नोव्हेंबरः
उत्तराखंड राज्यनिर्मिती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की,
उत्तराखंडला सन 2000 मध्ये आजच्या दिवशी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्याबद्दल उत्तराखंडच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. हे राज्य असे आहे की ते निसर्ग आणि अध्यात्मिकता यांच्याशी अत्यंत निकटतेने जोडले गेले आहे. या राज्याचे लोक राष्ट्र उभारणीसाठी विविध क्षेत्रांमध्ये अद्वितीय योगदान देत आहेत.आगामी वर्षांमध्ये उत्तराखंड अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जावो.
***
Jaydevi PS/Umesh K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874644)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam