पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी इजिप्त मधील कॉप 27 परिषदेत मॅन्ग्रोव्ह अलायन्स फॉर क्लायमेट (एमएसी) च्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित केले

Posted On: 08 NOV 2022 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 नोव्‍हेंबर 2022

 

ठळक मुद्दे:

  • एमएसी उपक्रम खारफुटीचे जागतिक महत्व पुढे नेण्यासाठी जगाला एकत्र आणते.
  • खारफुटीचे संवर्धन करण्यामधील भारताचा व्यापक अनुभव जागतिक ज्ञान संचयामध्ये भर घालणार.

केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मॅन्ग्रोव्ह अलायन्स फॉर क्लायमेट (एमएसी) च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. हा कार्यक्रम इजिप्त मध्ये अल-शेख येथे आयोजित कॉप 27 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.  

यावेळी बोलताना यादव म्हणाले:

खारफुटी ही जगातील सर्वात उत्पादक परीसंस्थांपैकी एक आहे. सागराच्या भरती-रेषेवरील हे  जंगल अनेक जीवांसाठी रोपवाटिका म्हणून काम करते, किनारपट्टीचे धूप होण्यापासून  संरक्षण करते, कार्बनचे पृथक्करण करते आणि लाखो लोकांसाठी उपजीविका पुरवते तसेच त्याच्या अधिवासात जीवजंतूना आश्रय देते.

खारफुटी हा अनेक उष्णकटिबंधीय किनारपट्टी भागाचा आर्थिक पाया आहे. नील अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किनारपट्टीवरील अधिवास, विशेषतः उष्णकटिबंधीय देशांमधील खारफुटीची शाश्वतता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे.

अनुकूलतेच्या उल्लेखनीय  वैशिष्ट्यांसह, खारफुटी ही उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय देशांची नैसर्गिक सशस्त्र सेना आहे. समुद्राची वाढती पातळी आणि चक्रीवादळ, वादळी हवामान यासारखी नैसर्गिक संकटे, अशा हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी खारफुटी हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

वातावरणातील वाढत्या जीएचजी संचयाचे प्रमाण कमी करण्याची प्रचंड क्षमता खारफुटीमध्ये आहे, हे आपण पाहतो. खारफुटीची जंगले जमीनीवरील उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा चार ते पाच पट जास्त कार्बन उत्सर्जन शोषून घेऊ शकतात, असे अभ्यासामधून दिसून आले आहे.  

असेही दिसून आले आहे की खारफुटी महासागरातील आम्लीकरणासाठी बफर म्हणून काम करू शकतात आणि सूक्ष्म प्लास्टिकचे सिंक उपलब्ध करतात

खारफुटीच्या वनीकरणातून नवीन कार्बन सिंक तयार करणे आणि उत्सर्जन कमी करणे हे देशांना त्यांचे एनडीसी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि कार्बन तटस्थता प्राप्त करण्याचे दोन व्यवहार्य मार्ग आहेत.

नैसर्गिक परीसंस्थेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी तसेच खारफुटीचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

भारताने जवळजवळ पाच दशके खारफुटीचे जतन करण्यामधील आपले कौशल्य प्रदर्शित केले आहे आणि आपल्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनारपट्टीवरील विविध प्रकारच्या  खारफुटीच्या परीसंस्थांचे जतन केले आहे.

खारफुटीचे संवर्धन, परीसंस्थेचे मूल्यमापन आणि कार्बन क्रमानिर्धारण यामधील व्यापक अनुभवामुळे भारत जागतिक ज्ञान-संचयामध्ये योगदान देऊ शकतो, तसेच खारफुटीचे जतन आणि संवर्धन यासाठी अत्याधुनिक उपाय आणि योग्य आर्थिक साधने निर्माण करण्यासाठी अन्य देशांच्या संयोगाने मदत मिळवू शकतो.

पुढील संदर्भ:

भारतातील खारफुटीच्या संवर्धनाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

भारत देशाचा वन अहवाल 2021 येथे वाचता येईल

आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1874575) Visitor Counter : 290