गृह मंत्रालय
देशभरात राबविलेल्या चार विशेष मोहिमांमधील कामगिरीबद्दल, 2022 वर्षासाठीची केंद्रीय गृहमंत्र्यांची ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’ घोषित, महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश
Posted On:
31 OCT 2022 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 31 ऑक्टोबर 2022
देशभरात राबविलेल्या चार विशेष मोहिमांमधील कामगिरीबद्दल, 2022 वर्षासाठीची केंद्रीय गृहमंत्र्यांची ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’ घोषित करण्यात आली आहेत. या पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे आणि पदे पुढीलप्रमाणे:
1. अंकित त्रिलोकनाथ गोयल, आयपीएस, एसपी
2. समीर अस्लम शेख, आयपीएस, एएसपी
3. संदिप पुंजा मंडलिक - इन्स्पेक्टर
4. वैभव अशोक रणखांब - एपीआय
5. सुदर्शन सुरेश काटकर, एपीआय
6. रतीराम रघुनाथ पोरेती - एपीएसआय
7. रामसे गवळी उईके - एचसी
8. ललित घनश्याम राऊत - नाईक
9. शागीर अहमद शेख, नाईक
10. प्रशांत अमृत बारसागडे, कॉन्स्टेबल
11. अमरदीप ताराचंद रामटेके, कॉन्स्टेबल
उच्च दर्जाचे नियोजन आवश्यक असणाऱ्या तसेच देश/राज्ये/केंद्रशासित प्रदेशाच्या आणि समाजातील मोठ्या घटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मोहिमांमधील अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी 2018 सालापासून ही पदके प्रदान केली जातात. दहशतवाद विरोधी मोहिमा, सीमेवरील कारवाई, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचाव कार्य अशा क्षेत्रातील विशेष मोहिमांमधील कामगिरीबद्दल ही पदके प्रदान केली जातात. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी या पदक विजेत्यांची घोषणा केली जाते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या या पदकांसाठी साधारणपणे एका वर्षात 3 विशेष मोहिमा तर असाधारण परिस्थितीत 5 विशेष मोहिमा विचारात घेतल्या जातात.
(पदक विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा)
* * *
S.Tupe/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1872253)
Visitor Counter : 315
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
Tamil
,
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu