पंतप्रधान कार्यालय
प्रतिष्ठेच्या 'नील' समुद्रकिनारे’ यादीमध्ये मिनीकॉय, थुंडी आणि कडमट या समुद्रकिनाऱ्यांना स्थान मिळाले म्हणून पंतप्रधानांनी केले लक्षद्वीपच्या जनतेचे विशेष अभिनंदन
किनारपट्टीच्या स्वच्छतेबद्दल भारतीयांमध्ये असलेल्या प्रेमाचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
26 OCT 2022 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या लोकांचे विशेष अभिनंदन केले आहे. जगातल्या सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून गणना जाणाऱ्या ‘नील समुद्र किनारे’ यादीमध्ये येथील मिनीकॉय, थुंडी आणि कडमट या समुद्रकिनाऱ्यांना स्थान मिळाले आहे म्हणून पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या लोकांचे विशेष अभिनंदन केले. पंतप्रधानांनी भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण किनारपट्टीचा खास उल्लेख केला आणि किनाऱ्यांच्या स्वच्छतेबद्दल भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या आवडीचे कौतुक केले.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या संदेश शेअर करत पंतप्रधानांनी खालील प्रमाणे ट्विट केले आहे,
"हे फारच विशेष आहे ! अभिनंदन. विशेषतः लक्षद्वीपच्या नागरिकांचे या पराक्रमाबद्दल विशेष अभिनंदन. भारताची किनारपट्टी खास आहे आणि आता आपल्या लोकांमध्ये किनाऱ्याच्या स्वच्छतेबद्दल खूप आवड दिसून येत आहे."
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1871084)
आगंतुक पटल : 283
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam