पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सर्वात अवजड उपग्रह वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारतीय अंतराळ संस्था, एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले

Posted On: 23 OCT 2022 10:10AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात वजनदार वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संस्था एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

जागतिक कनेक्टिव्हिटीसाठी उपयोगात येणाऱ्या 36 वनवेब (OneWeb) उपग्रहांसह आपल्या सर्वात वजनदार प्रक्षेपक वाहक एलव्हीएम 3 (LVM3)चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अभिनंदन.  LVM3 भारताची आत्मनिर्भरता सिध्द करते आणि जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा बाजारात भारताची स्पर्धात्मकता आणखी वाढवते."

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870435) Visitor Counter : 198