पंतप्रधान कार्यालय
महिला आशियाई चषक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2022 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
सातवा महिला आशियाई चषक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्वीटला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे:
"आपल्या महिला क्रिकेट संघाने दृढनिश्चय आणि कौशल्याने केलेली ही यशस्वी कामगिरी आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आशियाई महिला चषक जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन. या खेळात त्यांनी अद्वितीय कौशल्ये आणि संघभावनेचे प्रदर्शन केले. पुढच्या वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा !”
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868135)
आगंतुक पटल : 314
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam