पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मोढेरा इथल्या सूर्य मंदिराला दिली भेट

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2022 8:12PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या मोढेरा इथे सूर्य मंदिराला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. मोदी यांनी  सूर्य मंदिरातील, वारसा विद्युत रोषणाईचे उद्घाटनही केले. सौरऊर्जेवर चालणारे हे देशातले पहिले आणि एकमेव वारसा पर्यटन स्थळ ठरले आहे. त्याशिवाय, मोढेरा इथल्या सूर्य मंदिराचे त्रिमीतीय मॅपिंगचेही त्यांनी उद्घाटन केले. ह्या मंदिराचा इतिहास दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम देखील पंतप्रधानांनी पाहिला.

यावेळी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, गुजरात सरकारचे मंत्री पूर्णेशभाई मोदी आणि अरविंदभाई  रैयानी हेही यावेळी उपस्थित होते.

त्याआधी, पंतप्रधानांनी गुजरातमधील मोढेरा, मेहसाणा येथे 3900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांनी मोढेरा हे भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव असल्याची घोषणा  यावेळी केली.मोदींनी गुजरातमधील मोढेरा येथील मोढेश्वरी माता मंदिरातही देवीचे दर्शन घेत पूजा केली.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1866314)
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Hindi , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam