महिला आणि बालविकास मंत्रालय

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची कालमर्यादा 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढविली

Posted On: 07 OCT 2022 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2022

 

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्यासाठी आधी निश्चित केलेल्या 30 सप्टेंबर 2022 या विहित कालमर्यादेचा विस्तार करून आता 31 ऑक्टोबर 2022 रोजी 5 वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसाठीचे नवे पोर्टल (https://awards.gov.in/) आता कार्यान्वित झाले आहे अशी माहिती सामान्य जनतेला कळविण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी उपरोल्लेखित राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नोंदणी करून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करावा. ज्यांनी या पुरस्कारासाठी https://nca-wcd.nic.in/ या जुन्या पोर्टलवर याआधीच नोंदणी केली आहे ते अर्जदार देखील नव्या पोर्टलवर नोंदणी करून नामांकने सादर करू शकतात

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865895) Visitor Counter : 163