माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

53 व्या इफ्फीसाठी माध्यम प्रतिनिधींना आमंत्रण


भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फी - 53 ची बहार वाढवण्यासाठी आणि दर्जा अधिक उंचावण्यासाठी भारतीय आणि परदेशी प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे महोत्सवात स्वागत; इफ्फी’च्या माध्यम प्रतिनिधी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

गोवा/मुंबई, 6 ऑक्‍टोबर 2022

 

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या - इफ्फीच्या आयोजकांनी, प्रसार माध्यम प्रतिनिधींना ह्या सोहळ्याचे औपचारिक आमंत्रण दिले आहे. गोव्यात पणजी इथे 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ह्या महोत्सवात, भारत आणि जगभरातील समकालीन तसेच जुने दर्जेदार चित्रपट दाखवले जाणार आहेत.  

या महोत्सवात माध्यम प्रतिनिधी म्हणून जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपट समीक्षक, अभ्यासक आणि चित्रपट रसिक अशा सर्वांचे स्वागत करण्यास इफ्फीचे आयोजक अत्यंत उत्सुक आहेत. गोव्यासारख्या सागर किनाऱ्यावरील अप्रतिम सृष्टिसौंदर्याने नटलेल्या राज्यात, चित्रपटांच्या ह्या महासागररूपी सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी हे सगळे एकत्र येणार आहेत.

त्यामुळे या चित्रपटांचा आनंद लुटण्यासाठी, चित्रपटांतल्या रंगीबेरंगी कथांचे उलगडणारे विश्व बघण्यासाठी, मानवी आयुष्यातल्या संघर्षांचे, भावभावनांचे, इच्छा-आकांक्षांचे, सर्वसामान्यांच्या असामान्य कथा पाहण्यासाठी, त्यातील पात्रांच्या आणि चित्रपट निर्मात्यांच्या स्वप्नांचा भाग होण्यासाठी, इफ्फीला जरूर भेट द्या. इथे सिनेमाचा सोहळा पडद्यावरही असतो आणि पडद्याबाहेरही ! या महोत्सवात केवळ अत्यंत संवेदनशीलपणे आणि जागरूकतेने निवडलेले जगभरातले चित्रपटच नसतात, तर त्यासोबत, चित्रपट समीक्षा, मास्टरक्लासेस मधून चित्रपट निर्मितीचे ज्ञान, चर्चा, परिसंवाद आणि निर्माते दिग्दर्शकांशी संवाद असे सर्व कार्यक्रम, ह्या सगळ्याचा उत्सव म्हणजे खरे तर इफ्फी आहे.

हा चित्रपट महोत्सव यशस्वी होण्यात, माहिती आणि संवादाची मध्यवर्ती भूमिका आहे. चित्रपट संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, कलेविषयीच्या प्रेमाची कदर करण्यासाठी, इतकेच नाही, तर जगभरातल्या माणसांची आयुष्ये, त्यांची परिस्थिती, त्यांची सुखदु:खे ह्या सगळ्याचा अत्यंत सखोल आणि हळुवार अनुभव घेण्यात, हा महोत्सव आपल्याला मदत करतो. म्हणूनच, आम्ही जेव्हा माध्यम प्रतिनधी म्हणून नोंदणी करण्याचे आणि महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन आपल्याला करतो, त्याचवेळी, सिनेमाच्या या उत्सवात आपण आपले व्यावासायिक योगदान द्यावे, माध्यमांच्या ताकदीचा उपयोग करत, महोत्सवातील दर्जेदार चित्रपटांना, त्यांच्या निर्माते-दिग्दर्शक कलाकारांना प्रसिद्धी द्यावी, असे आवाहनही करतो आहोत.

1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही वयाची 21 वर्षे पूर्ण केली असतील आणि मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, किंवा डिजिटल/ऑनलाईन माध्यम संस्थेत कार्यरत असाल, तर माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करु शकता. तसेच, वयोमर्यादेचा निकष पूर्ण होत असेल, तर मुक्त पत्रकार म्हणूनही नोंदणी करता येईल. https://my.iffigoa.org/extranet/media/ या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करता येईल.

नोंदणीची पद्धत अतिशय सोपी आहे, मात्र तरीही तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील, तर नोंदणी अर्जासोबत दिलेल्या लिंकवर असलेल्या मार्गदर्शक सूचना, तुमच्या कामी येऊ शकतील. आणि त्यानंतरही तुमच्या शंकांचे निरसन झाले नाही, तर PIB, पत्रसूचना कार्यालयाच्या  iffi-pib[at]nic[dot]in येथे भेट द्यावी किंवा दूरध्वनीवरून आमच्याशी संपर्क साधावा. (सुमारे 10 ते संध्याकाळी 6 - भारतीय प्रमाणवेळ) दूरध्वनी क्रमांक: +91-832-2956418.

तुमचा नोंदणी अर्ज 5 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार) ऑनलाइन सबमिट करायला विसरू नका. पण एवढी प्रतीक्षा तरी का करायची? लगेच सबमिट करा!

प्रत्‍येक माध्‍यम संस्‍थेसाठी नियोजित संख्‍येसह, प्रसारमाध्‍यम आऊटलेटच्‍या आवश्यकतेनुसार, त्‍यांचा आकार, सिनेमाला त्यांनी दिलेले महत्त्व आणि त्याची प्रसिद्धी, इफ्फीच्या वृतांकनाबाबतच्या अपेक्षा या निकषांनुसार आम्‍ही PIB तर्फे अर्जाचा विचार करणार आहोत.

स्वत:ची सुरक्षा आणि समाजहीताचा विचार करून तुम्ही सर्वांनी कोविड-19 ची लस घेतली असावी, अशी आम्हाला आशा आहे. जर तुम्ही कोविड लस घेतली असेल, तर त्यांचे प्रमाणपत्रही आपल्या अर्जासोबत जोडावे.

 

इफ्फीविषयी:

1952 पासून सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा आशियातील सर्वात प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. 2004 साली प्रथमच गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला ह्या निसर्गसंपन्न किनारपट्टीच्या राज्यात घरच मिळाले आहे, दरवर्षी या महोत्सव गोव्यातच आयोजित केला जातो आहे. 2014 साली, दरवर्षी गोव्यातच कायमस्वरूपी इफ्फीचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.

चित्रपट, त्या माध्यमातून सांगितलेल्या कथा आणि त्यामागील लोकांचे आयुष्य असे सर्व काही साजरे करणे, त्याचा उत्सव साजरा करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. आणि हे करत असतांना, ह्या सर्व आयोजनाचे कौतुक करावे, चित्रपटांविषयीचे प्रेम, ह्या सृष्टीतील लोकांमधला बंधुभाव, त्यांचा समंजसपणा, या सगळ्यात एक दुवा म्हणून काम करावे, तसेच, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि एकत्रित उपक्रमांतही सर्वोत्तम काही देण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी हा महोत्सव, गोवा सरकारच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील चित्रपट महोत्सव संचालनालय - DFF आतापर्यंत महोत्सवाचे आयोजन करत असे, मात्र आता राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये - NFDC मध्ये चित्रपटेतर सर्व माध्यम विभागांचे विलीनीकरण झाल्यामुळे, यावर्षी एनएफडीसी ने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

53 व्या इफ्फीशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती, महोत्सवाचे संकेतस्थळ - www.iffigoa.org, तसेच पत्रसूचना कार्यालायचे संकेतस्थळ (pib.gov.in), आणि इफ्फीची समाजमाध्यमांवरील सर्व अकाउंट्स आणि पीआयबी गोवा च्या सोशल हँडलवर बघता येईल. तेव्हा, चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज राहा.. आम्हीही त्याचा आनंद तुमच्यासोबत शेअर करूच !


* * *

PIB Mumbai/Goa | M.Pange/R.Aghor/D.Rane-IFFI 53 - 2

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1865579) Visitor Counter : 262