पंतप्रधान कार्यालय
पलक्कड येथे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
06 OCT 2022 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2022
केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत, पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“केरळच्या पलक्कड जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.”
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.
* * *
M.Pange/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1865567)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam