पंतप्रधान कार्यालय

कानपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


मृत आणि जखमींना सानुग्रह निधी दिला जाणार

Posted On: 01 OCT 2022 10:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला आहे.

तसेच त्यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांचा सानुग्रह निधी दिला जाईल, असे जाहीर केले. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जाणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

कानपूरमधील ट्रॅक्टर-ट्रॉली अपघातामुळे मन विदीर्ण झाले. आपले जिवलग आणि प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi

प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपये सानुग्रह निधी दिला जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जाणार आहेत.

: पंतप्रधान @narendramodi

***

S.Pophale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864433) Visitor Counter : 105