युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 साठीची अंतिम तारीख वाढवली आहे
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आता 27 सप्टेंबर 2022 ते 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Posted On:
28 SEP 2022 11:03AM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार (RKPP) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी 27 ऑगस्ट 2022 रोजी अर्ज मागवले आहेत. या संदर्भातली अधिसूचना www.yas.nic.in या वेबसाईटवर पाहता येईल.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2022 ते 1 ऑक्टोबर 2022 (शनिवार) पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुरस्कारासाठी पात्र खेळाडू/प्रशिक्षक/संस्था/विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांनी dbtyas-sports.gov.in या संबंधित पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना / भारतीय क्रीडा प्राधिकरण / मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ / क्रीडा प्रोत्साहन मंडळे / राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांना देखील त्यानुसार सूचित करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2022 (शनिवार) नंतर प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांचा विचार केला जाणार नाही.
***
Gopal C/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862841)
Visitor Counter : 222