महिला आणि बालविकास मंत्रालय

पोषण अभियान 2022 : टी 3 शिबिरे (चाचणी, उपचार, चर्चा), आयएफए वितरण, परिसंवाद, रक्तक्षयावर उपचारासाठी आयुष, वेबिनार, प्रश्नमंजुषा यांसारखे विविध उपक्रम देशभरात आयोजित



पोषण पंधरवडा, 2022 दरम्यान ; रक्तक्षय प्रतिबंधक 5,03,411 उपक्रम, गर्भधारणेदरम्यानच्या रक्तक्षयावरील उपचारासाठी आयुषसंदर्भात 7,18,149 उपक्रम आणि रक्तक्षय दूर करण्यासाठी आयुषच्या भूमिकेवर आधारित 56,168 वेबिनार उपक्रम असे एकूण 12.77 लाख उपक्रम आयोजित

रक्तक्षयाला प्रतिबंध करण्याच्या सर्वसमावेशक धोरणाचा एक भाग म्हणून सरकारने अनेक राज्यांमधील योजना/कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्रालयांकडून मुख्य अन्न अधिक पोषणतत्वयुक्त करण्याच्या धोरणाचा केला समावेश

Posted On: 27 SEP 2022 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

देशात सध्या सुरू असलेल्या पोषण महिना 2022 मध्ये, लहाने मुले, किशोरवयीन मुली, गरोदर आणि स्तनदा मातांमध्ये रक्तक्षय  प्रतिबंध आणि उपचारासाठी टी 3 शिबिरे (चाचणी, उपचार, चर्चा), आयएफए वितरण, परिसंवाद, रक्तक्षयावर उपचारासाठी आयुष, वेबिनार, प्रश्नमंजुषा आणि पाककृती स्पर्धा, पारंपारिक खाद्य पद्धती, जनजागृती  रॅली असे विविध उपक्रम देशभरात आयोजित केले जात आहेत.

रक्तक्षय ही अशी शारीरिक  स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या (आरबीसी) आणि परिणामी त्यांची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता शरीराच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी असते. शरीरात लोहाची कमतरता आणि त्यानंतर लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयामध्ये  आहाराच्या सवयी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.लोहाच्या कमतरतेमुळे  होणारा रक्तक्षय  हा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि आहारातील बदलांच्या माध्यममातून  यावर उपचार करणे तुलनेने सोपे आहे. सामान्य लोकांमध्ये लोहाच्या  कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय  रोखण्यासाठी, आहारातील बदल/अधिक पोषणमूल्ययुक्त आहाराचे सेवन / आहारातील वैविध्य आणि आरोग्यदायी वातावरणाद्वारे लोहाचे सेवन वाढवण्यासाठी अन्नावर आधारित दृष्टीकोन ही महत्त्वाची शाश्वत धोरणे आहेत.

रक्ताक्षयाला प्रतिबंध  करण्याच्या सर्वसमावेशक रणनीतीचा एक भाग म्हणून, भारत सरकारने अनेक राज्यांमधील योजना/कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्रालयाकडून प्रमुख आहार अधिक पोषणयुक्त करण्याचे धोरण  समाविष्ट केले आहे.

लोकसहभागाअंतर्गत सामाजिक आणि आहारविषयक सवयी मधील बदलाबाबत संवाद (एसबीसीसी )या धोरणाचा एक भाग म्हणून,मार्चमध्ये पोषण पंधरवडा , 2022 मध्ये सुमारे 6,278 रक्तक्षय  शिबिरे, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये 1,853 जागृकता  उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी 855 प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि रक्तक्षयावर आधारित 1,63,436 उपक्रम  घेण्यात आले.

महिला आणि बालविकास  मंत्रालयाने आयुष मंत्रालयासोबत एकत्र येऊन पोषण पंधरवडा , 2022 दरम्यान एकूण 12.77 लाख उपक्रम राबविले त्यात  रक्तक्षय  प्रतिबंधक 5,03,411 उपक्रम, गर्भधारणेदरम्यानच्या  रक्तक्षयावर उपचारासाठी आयुषसंदर्भात 7,18,149 उपक्रम  आणि रक्तक्षय  दूर करण्यासाठी आयुषच्या भूमिकेवर आधारित 56,168 वेबिनार उपक्रमांचा समावेश आहे.याशिवाय, पोषण महिना  2021 मध्ये, गर्भधारणेदरम्यानच्या  रक्तक्षयावरील उपचारासाठी आयुष संदर्भात 27,55,905 उपक्रम आणि 63,013 रक्तक्षय  शिबिरावर आधारित उपक्रम घेण्यात आले.

पोषण महिना 2022 दरम्यान राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी रक्तक्षय संदर्भात राबवलेल्या उपक्रमांची झलक

 

 

 

R.Aghor /S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862576) Visitor Counter : 190