पंतप्रधान कार्यालय
अर्थव्यवस्था, समाजकार्य आणि पर्यावरणाचा समावेश असलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहून पंतप्रधानांनी साजरा केला आपला जन्मदिवस
सर्वांच्या शुभेच्छा आणि आपुलकीबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2022 9:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरणाचा समावेश असलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आज आपला वाढदिवस साजरा केला. आपल्याला मिळालेल्या शुभेच्छा आणि आपुलकीबद्दल त्यांनी कृतज्ञता देखील व्यक्त केली.
मोदी आपल्या ट्वीटर संदेशात म्हणाले:
“मला मिळालेल्या आपुलकीने मी भारावून गेलो आहे. मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. या शुभेच्छांमुळे मला आणखी जोमाने काम करायचे बळ मिळते. आजचा दिवस विविध सामाजिक सेवा उपक्रमांसाठी समर्पित करणाऱ्या सर्वांची मी प्रशंसा करतो. त्यांचा निर्धार प्रशंसनीय आहे.”
“आजचा दिवस अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरणाचा समावेश असलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मी व्यतीत केला. माझा या गोष्टीवर विश्वास आहे की जेव्हा आपण या क्षेत्रांवर एकत्रितपणे काम करू, तेव्हा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचे आपले उद्दिष्ट सफल होईल. आगामी काळात आपण अधिक परिश्रम घेत राहूया.”
पंतप्रधानांना अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.
डॉमिनिका राष्ट्रकुलचे पंतप्रधान, रुझवेल्ट स्केरिट यांना पंतप्रधानांनी उत्तर दिले
“पंतप्रधान @SkerritR, आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.”
नेपाळचे पंतप्रधान एच. ई शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधान म्हणाले
“पंतप्रधान @SherBDeuba, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी मनापासून भारावून गेलो आहे.
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जग्गनाथ यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आणि मोदींनी त्याला उत्तर दिले
“माझे प्रिय मित्र पंतप्रधान @KumarJugnauth यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”
भुतानच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांना पंतप्रधानांनी उत्तर दिले.
“@PMBhutan यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. भुतानमधील माझ्या मित्रांकडून मला नेहमी मिळालेले प्रेम आणि आदर माझ्यासाठी खरोखर महत्वाचे आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. पंतप्रधानांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. “माननीय राष्ट्रपती, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप-खूप धन्यवाद @rashtrapatibhvn”
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले “उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे @VPSecretariat”
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे.
“आपल्याला मनापासून धन्यवाद माननीय @ramnathkovind जी।“
माजी उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी दिलेल्या शुभेच्छांना पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे,
“वेंकैय्या गारु, आपण दिलेल्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो आहे. @MVenkaiahNaidu”
***
S.Thakur/R.Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1860318)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam