पंतप्रधान कार्यालय
शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत भेट
Posted On:
16 SEP 2022 11:02PM by PIB Mumbai
1.उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी भेट घेतली. राष्ट्रपती रायसी यांनी 2021मधे पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरची ही पहिली भेट होती.
2. बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली तसेच संबंध आणखी दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-इराण द्विपक्षीय संबंधांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, त्यात उभय देशांचा परस्परांशी थेट संवाद संपर्काचाही समावेश आहे यावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
3.शाहिद बेहेस्ती टर्मिनल, चाबहार बंदराच्या विकासातील प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला. प्रादेशिक दळणवळणा बाबत द्विपक्षीय सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
4.अफगाणिस्तानसह आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. अफगाणिस्तानातील लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत देण्याच्या भारताच्या प्राधान्यक्रमांचा आणि शांततापूर्ण, स्थिर आणि सुरक्षित अफगाणिस्तानच्या समर्थनार्थ प्रातिनिधिक तसेच समावेशक राजकीय मदतीच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
5.राष्ट्रपती रायसी यांनी पंतप्रधानांना जेसीपीओए वाटाघाटींच्या स्थितीबद्दल माहिती दिली.
6. पंतप्रधानांनी राष्ट्रपती रायसी यांना सोयीनुसार लवकरात लवकर भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.
समरकंद
16 सप्टेंबर 2022
***
Sushama K/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860034)
Visitor Counter : 139
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam