ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या कपड्यांचे किंवा होजियरीचे अनुपालन ओझे कमी करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी केंद्राने कायदेशीर मापनपद्धती (वेष्टनामधील वस्तू) नियम 2011 मध्ये केली सुधारणा


कायदेशीर मापनपद्धती (वेष्टनातील वस्तू) नियम, 2011 अंतर्गत आवश्यक असलेल्या 6 करारांमधून वस्त्रोद्योग किंवा होजियरी उद्योगांना या दुरुस्तीमुळे खुल्या स्वरुपात विक्री करणाऱ्याला सूट दिली जाते.

ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, केवळ ग्राहकांशी संबंधित करार कायम राहतील

Posted On: 25 AUG 2022 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022

 

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालया अंतर्गत असलेल्या ग्राहक व्यवहार विभागाला, कायदेशीर मापनपद्धती (वेष्टनातील वस्तू) नियम 201 मधून खुल्या स्वरुपात विकल्या जाणाऱ्या कपडे किंवा होजियरीला सूट देण्यासाठी विविध प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

म्हणून, ग्राहक व्यवहार, कायदेशीर मापनपद्धती विभागाने (वेष्टनातील वस्तू) (तृतीय सुधारणा) नियम, 2022 द्वारे वस्त्रोद्योग किंवा होजियरी उद्योगांना कपडे किंवा होजियरी वस्तू खुल्या स्वरुपात विकण्यास सूट दिली आहे.  व्यवसाय सुलभता आणि अनुपालन ओझे कमी करण्यासाठी, खालील घोषणा करत ही सूट देण्यात आली आहे:

(i) वस्तूचे सामान्य/ जेनेरिक नाव

(ii) वेष्टनातील वस्तूचे एकूण प्रमाण, दर्जा, एककाची डब्लू किंवा एम मधील संख्या

(iii) एककाची विक्री किंमत

(iv) उत्पादन, वेष्टनपूर्व किंवा आयातीचा महिना आणि वर्ष

(v) कालानुरुप वस्तू वापरणे मानवी आरोग्यास अयोग्य ठरणार असेल तर कधीपर्यंत ती वापरणे योग्य याची तारिख, महिना आणि वर्ष

(vi) ग्राहक सेवा कक्षाचे नाव आणि पत्ता

आता ग्राहकांशी संबंधित पुढील माहितीच  द्यायची आहे  उदा:

(i)वस्तू आयात केली असेल तर उत्पादकाचे नाव आणि पत्ता/ विपणनकर्ता/ नाममु्द्राधारक/ कोणत्या देशाचा आयातदार आहे

(ii)ग्राहक सेवा इमेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक,

(iii)आंतरराष्ट्रीय प्रमाणित आकार निर्देशक उदा.  S, M, L, XL, XXL आणि XXXL याची सेंटीमीटर तसेच मीटर या प्रमाणात तपशीलवार नोंद असावी

(iv)कमाल किरकोळ/विक्री किंमत (एमआरपी)  

ग्राहक व्यवहार विभागाकडून जारी करण्यात आलेली अधिसूचना ही ग्राहकांशी  संबंधित माहिती घोषित करून ग्राहकांच्या हिताशी तडजोड न करता उद्योगांवरील अनुपालनाचा भार कमी करून व्यवसाय सुलभ करण्यासाठी आहे.

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854411) Visitor Counter : 200