ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खाद्यतेल उत्पादकांनी तापमानाशिवाय तेलाचे निव्वळ प्रमाण जाहीर करतानाच त्याचे घनतेप्रमाणे वजन घोषित करण्याचे केंद्राचे निर्देश
तेल निर्माते, पॅकर्स आणि आयातदारांना निर्देश जारी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजेच 15 जानेवारी, 2023 पर्यंत त्यांचे लेबलिंग दुरूस्त करण्याचा सल्ला
Posted On:
25 AUG 2022 2:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट, 2022
खाद्यतेल उत्पादक/ पॅकर्स/ आयातदार यांनी खाद्यतेल आणि इतर तत्सम पदार्थावरील निव्वळ प्रमाण, वजन घोषित करण्याबरोबरच तापमानाशिवाय आकारमान घोषित करावे, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने त्यांना उत्पादनाच्या वजनासह तापमानाचा उल्लेख न करता निव्वळ प्रमाण घोषित करण्याच्या त्यांच्या लेबलिंगमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. तशा प्रकारचे लेबलिंग, प्रस्तूत निर्देश जारी केलेल्या तारखेच्या सहा महिन्यांच्या आत म्हणजे 15 जानेवारी, 2023 पर्यंत दुरूस्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कायदेशीर मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 अंतर्गत, ग्राहकांच्या हितासाठी सर्व प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंवर इतर घोषित माहितीशिवाय वजनाच्या मानक प्रमाणाच्या संदर्भामध्ये निव्वळ प्रमाण घोषित करणे किंवा मोजमाप नमूद करणे अनिवार्य आहे.
या नियमांमध्ये केलेल्या तरतुदी अनुसार खाद्यतेल, वनस्पती तूप अशा पदार्थांचे पॅकेटमध्ये निव्वळ प्रमाण वजनामध्ये किंवा घनतेच्या परिमाणामध्ये घोषित करणे आवश्यक आहे. आणि जर ते पदार्थाच्या घनतेनुसार घोषित केले असेल तर त्याचे समतुल्य वजनही घोषित करणे आवश्यक आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, तेलाचे निव्वळ परिमाण जाहीर करताना तापमानाच्या सक्रियतेचाही उल्लेख करतात.
तेल उत्पादक/पॅकर्स/आयातदार खाद्यतेलाच्या एककासह पॅकिंगच्या वेळी तापमानाचा उल्लेख करून खाद्यतेलाचे निव्वळ प्रमाण घोषित करत आहेत. उदाहरणार्थ एक लीटर खाद्यतेलाचे वस्तूमान वेगळे असू शकते. तसेच काही वेळा ते स्थिरही असू शकते. काही उत्पादक 600सी पर्यंत तापमान दर्शवत आहेत. मात्र पॅकेजिंगमध्ये जास्त तापमानाचा उल्लेख केला असेल तर वस्तूमानामध्ये फरक पडतो. सोयाबीन खाद्यतेलाचे वजन वेगवेगळ्या तापमानांवर वेगवेगळे असू शकते. याचा तपशील पुढील तक्त्यामध्ये दिला आहे.
Sr. No.
|
Temperature
|
Weight (in g)
|
1
|
210C
|
919.1
|
2
|
300C
|
913.0
|
3
|
400C
|
906.2
|
4
|
500C
|
899.4
|
5
|
600C
|
892.6
|
खाद्यतेलाचे वजन वेगवेगळ्या तापमानाला वेगळे असते, त्यामुळे खरेदीच्या वेळी ग्राहकाला पॅकेजमध्ये योग्य प्रमाणात तेल मिळाले पाहिजे, याची खात्री करण्यासाठी तेल उत्पादक/ पॅकर्स/ खाद्यतेलाचे आयातदार यांनी तापमानाचा उल्लेख न करता उत्पादन पॅक करताना आणि घोषित केलेले प्रमाण सुनिश्चित करण्यासाठी निर्देश दिले आहेत. आकारमान आणि वस्तूमान यांचे पॅकेज योग्य प्रमाणात असावे, असा सल्ला दिला आहे.
S.Tupe/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854346)
Visitor Counter : 216