पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 च्या अंतिम फेरीच्या, 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन


75 केंद्रांवरील 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी या अंतिम फेरीत होणार सहभागी

या अंतिम फेरीत, 2900 शाळा तसेच 2200 उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, 53 केंद्रीय मंत्रालयांच्या 476 समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन्समुळे, भारतातील युवकांमध्ये उत्पादनांसाठी अभिनव कल्पना शोधणे, समस्यांवर उपाय आणि चौकटीबाहेर विचार करण्याची संस्कृती विकसित झाली आहे

प्रविष्टि तिथि: 23 AUG 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्टला, रात्री 8 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 च्या अंतिम फेरीच्या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील.

देशांत, विशेषत: युवा पिढीच्या मनात अभिनव संशोधनवृत्ती रुजवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. हाच विचार पुढे नेत, 2017 साली भारतात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) ची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांना समाज, संघटना आणि सरकारच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी उपक्रम म्हणून स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये उत्पादननांविषयी अभिनव कल्पकता, नावीन्य रुजणे समस्या सोडवणे आणि चौकटीबाहेरच्या विचारांना चालना देणारी संस्कृती रुजवणे हा या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचा उद्देश आहे.

गेले अनेक वर्षे हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहे. हॅकेथॉन ला पहिल्या वेळी  7500  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी पाचव्या आवृत्तीच्या वेळी मात्र, ही संख्या सुमारे 29,600  पर्यंत वाढली आहे, हे या लोकप्रियतेचेच द्योतक आहे.                                                                                                                                                               

यावर्षीया महाअंतिम फेरीचा भाग म्हणून 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि मार्गदर्शक 75 नोडल केंद्रात जाऊन या स्पर्धेत सहभागी होतील. 2900 शाळांचे तसेच 2200 उच्चशिक्षण संस्थांचे विद्यार्थी 53 केंद्रीय मंत्रालयांच्या 476 समस्यांवर उपाययोजना शोधणार आहेत. यात, मंदिरातील शिलालेख आणि देवनागरी लिपींमधील भाषांतरांचे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR), नाशवंत खाद्यपदार्थांसाठी शीत पुरवठा साखळीमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज-सक्षम जोखीम निरीक्षण प्रणाली, भूप्रदेशाचे उच्च-रिझोल्यूशन 3D मॉडेल, आपत्तीग्रस्त भागात पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची परिस्थिती इत्यादी सुविधा असणार आहे.

यावर्षीस्मार्ट इंडिया हॅकाथॉन - ज्युनियर हा देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक पथदर्शी उपक्रम म्हणून सुरु करण्यात आला आहे. यामुळे, शालेय स्तरावरच नाविन्याची संस्कृती आणि  समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित होईल.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1853897) आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada