पंतप्रधान कार्यालय
76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
Posted On:
15 AUG 2022 9:45PM by PIB Mumbai
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान अँथनी अल्बानीज, आपण दिलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्री काळाच्या कसोटीवर उतरली आहे आणि त्याचा विशेष लाभ दोन्ही देशांतील लोकांना होत आहे."
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"राष्ट्रपती इबुसोलीह स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच भारत-मालदीव यांच्यातील मजबूत मैत्रीबद्दल तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमळ उद्गारांबद्दल धन्यवाद.
फ्रान्सच्या अध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन, आपण दिलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो. भारत फ्रान्ससोबतचे घनिष्ट संबंध विश्वासाने जोपासतो. आपली द्विपक्षीय भागीदारी जागतिक हितासाठी आहे."
भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी दिलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर्व भारतीय भूतानसोबत - एक जवळचा शेजारी आणि एक अमूल्य मित्र म्हणून विशेष नाते जोपासतात.
डॉमिनिका कॉमनवेल्थ देशाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट, आपण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले आभार. भारत आणि डॉमिनिका कॉमनवेल्थ देशातील द्विपक्षीय संबंध येणाऱ्या काळात वृध्दींगत होवोत.
मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान प्रविंद कुमार जग्गनाथ, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण आमचा सन्मान केलात. भारत आणि मॉरिशसमध्ये दीर्घ काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. आपल्या नागरिकांच्या परस्पर लाभांसाठी आपली राष्ट्रे देखील विविध विषयांमध्ये सहकार्य करत आहेत."
मादागास्करच्या राष्ट्रपतींनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधान म्हणाले;
"अध्यक्ष अँड्री राजोलिना आमच्या स्वातंत्र्यदिनी आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल आपले आभार. विकासातील एक विश्वासू भागीदार म्हणून, भारत मादागास्करमधील लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल."
नेपाळच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"पंतप्रधान शेर बहादूर देवबा आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. येणाऱ्या काळातही भारत-नेपाळ मैत्री वृध्दींगत होत राहो."
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1852212)
Visitor Counter : 185
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu