पंतप्रधान कार्यालय
भारतभर सर्वत्र निर्माण झालेल्या "हर घर तिरंगा" भावनेचे पंतप्रधानांनी घडवले दर्शन
Posted On:
12 AUG 2022 11:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानासाठी देशभरातील लोकांच्या उत्साहाची उदाहरणे ट्विट केली आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले की:
"अलौकिक दृश्य! देशात जळी, स्थळी आणि आकाशात फडकणारा तिरंगा पाहून प्रत्येक भारतीयाला आनंद होत आहे. #हरघर तिरंगा"
"या भावनेला नमस्कार! तिरंग्याबद्दल अतुलनीय आदराचे हे धाडसी दृश्य भारतीयांचा उत्साह आणि आकांक्षा दर्शवते. #हरघर तिरंगा"
"अप्रतिम! भारताच्या भावी कर्णधारांनी भरलेली अशी तिरंगा यात्रा प्रत्येकामध्ये देशभक्तीचा जोष निर्माण करणारी आहे. #हरघर तिरंगा"
“विशाखापट्टणमच्या लोकांचा हा एक उत्तम सामूहिक प्रयत्न आहे. #HarGharTiranga बद्दलच्या उत्साहाची मी प्रशंसा करतो."
"लडाखमधला एक उत्कृष्ट प्रयत्न जो #हरघर तिरंगा चळवळीचा उत्साह वाढवेल."
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851415)
Visitor Counter : 191
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam