पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय हातमाग दिनी पंतप्रधानांकडून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला अभिवादन


स्टार्टअप्सशी संबंध असलेल्या युवा वर्गाला हातमाग स्टार्ट अपविषयक भव्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 07 AUG 2022 2:18PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि भारताच्या कलात्मक परंपरांची जोपासना करण्यासाठी काम करत असलेल्या सर्वांना अभिवादन केले आहे. स्टार्ट अप्सशी संबंधित युवा वर्गाने हातमागविषयक स्टार्टअप ग्रँड चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होण्याचे देखील पंतप्रधानांनी  आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

राष्ट्रीय हातमाग दिनी मी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि भारताच्या कलात्मक परंपरांची जोपासना करण्यासाठी काम करत असलेल्या सर्वांना अभिवादन करत आहे.  #MyHandloomMyPride

विणकरांसाठी आपल्या कल्पना मांडण्याची आणि नवोन्मेषाची एक उत्तम संधी. स्टार्ट अप जगताशी संबंधित असलेल्या सर्व युवा वर्गाला यामध्ये सहभागी होण्याचे मी आवाहन करत आहे.

#MyHandloomMyPride

***

R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1849393) Visitor Counter : 172