पंतप्रधान कार्यालय
कुस्तीपटू पूजा गेहलोत हिला उज्ज्वल भवितव्यासाठी पंतप्रधानांनी दिले प्रोत्साहन
“पूजा तुझे पदक दिलगिरीची नव्हे आनंदोत्सवाची मागणी करत आहे”
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2022 8:48AM by PIB Mumbai
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 50 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्यावर पूजा गेहलोत हिने समाजमाध्यमावर लिहिलेली एक भावनिक पोस्ट एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केल्यावर त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा गेहलोतला तिच्यासमोर असलेल्या उज्ज्वल भवितव्याबाबत प्रोत्साहन देत नाऊमेद न होण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
"पूजा तुझे पदक दिलगिरीची नव्हे, आनंदोत्सव साजरा करण्याची मागणी करत आहे. तुझा जीवनप्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, तुमचे यश आम्हाला आनंदित करते. यापुढच्या काळात तू महान कामगिरी करशील हे तुझे विधिलिखित आहे,.. चमकदार कामगिरी करत रहा! ⭐️"
****
SonalT/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849328)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam