पंतप्रधान कार्यालय
जुलै महिन्यात 6 अब्ज युपीआय व्यवहार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं कौतुक
Posted On:
02 AUG 2022 10:44AM by PIB Mumbai
देशात जुलै महिन्यात युपीआयच्या माध्यमातून 6 अब्ज डिजिटल व्यवहार झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचं कौतुक केलं आहे. 2016 नंतरचे हे सर्वाधिक व्यवहार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:--
“ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा आणि अर्थव्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा भारतीय नागरिकांचा संकल्प आहे, याचेच हे संकेत आहेत. विशेषतः कोविड-19 च्या काळात, डिजिटल व्यवहार अतिशय उपयुक्त ठरले.”
***
SonalT/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847288)
Visitor Counter : 199
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam