पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कॅडेट (U-17) जागतिक कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्ती दलाचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2022 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

इटली मधील रोम शहरात झालेल्या कॅडेट (U-17) जागतिक कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 वर्षांखालील भारतीय चमूचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"7 सुवर्णांसह 14 पदके (ज्यापैकी 5 महिला खेळाडूंनी जिंकली आहेत) आणि 32 वर्षांनंतर ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण, ही कॅडेट (U-17) जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. भारताने पदक तालिकेत देखील अव्वल स्थान पटकावले आहे. या चमूचे हार्दिक अभिनंदन."

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1847169) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam