पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 29 JUL 2022 10:26PM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्रांचे महासचिव  (यूएनएसजी ) महामहिम अँटोनियो गुटेरेस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.


उभय नेत्यांनी  कांगो लोकशाही प्रजासत्ताकमधील (एमओएनयूएससीओ) संयुक्त राष्ट्र संघटना स्थैर्य  मोहिमेवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यासंदर्भात  ज्यात दोन भारतीय शांती सैनिक शहीद झाले याबाबत  चर्चा केली,.

 
या हल्ल्यातील दोषींचा न्याय करण्यासाठी जलदगतीने तपास सुनिश्चित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा जनरलला
केले. आतापर्यंत 2,50,000 हून अधिक भारतीय शांतीरसैनिकांनी संयुक्त राष्ट्र  शांतता मोहिमेअंतर्गत सेवा बजावली आहे . 177 भारतीय शांतीसैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सेवा देताना सर्वोच्च बलिदान दिले आहे, जे कोणत्याही देशाच्या सैन्याने दिलेल्या योगदानापेक्षा सर्वाधिक आहे असे सांगत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये  भारताची कायम असलेली वचनबद्धता अधोरेखित केली.  

 
शहीद झालेल्या दोन भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या कुटुंबियांप्रति  तसेच सरकार आणि भारतातील जनतेप्रति संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी
 शोकसंवेदना  व्यक्त केल्या. त्यांनी एमओएनयूएससीओ वरील हल्ल्याचा स्पष्टपणे पुन्हा एकदा निषेध केला आणि जलद तपास करण्यासाठी शक्य ती सर्व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांगो लोकशाही प्रजासत्ताकमध्ये   शांतता आणि स्थैर्यासाठी भारताचा अढळ पाठिंबा अधोरेखित केला.  सुमारे 2040 भारतीय सैनिक सध्या एमओएनयूएससीओ येथे तैनात आहेत.

***

Jaydevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846902) Visitor Counter : 173