पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकणारी भारोत्तोलक बिंद्यारानी देवीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2022 8:11AM by PIB Mumbai

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक बिंद्यारानी देवीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, रौप्य पदक जिंकल्याबद्दल बिंद्यारानी देवीचे अभिनंदन. ही कामगिरी तिच्या जिद्दीचे दर्शन घडवणारी आहे आणि तिच्या यशामुळे प्रत्येक भारतीयाला खूप आनंद झाला आहे. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो."

***

SK/SM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1846688) आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam