पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उद्या म्हणजे 31 जुलैला सकाळी 11 वाजता होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम सर्वांनी ऐकण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन


‘मन की बात’ च्या बुकलेट ची जून आवृत्ती पंतप्रधानांनी केली शेअर

प्रविष्टि तिथि: 30 JUL 2022 6:27PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांचा जनतेशी होणारा मासिक संवादात्मक कार्यक्रम, ‘मन की बातउद्या म्हणजेच 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांनी आवर्जून ऐकावा, असे  आवाहन पंतप्रधानांनी केले  आहे.

तसेच, जून महिन्यातील मन की बात कार्यक्रमाचे बुकलेट देखील पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन शेअर केले आहे. याच्या मुखपृष्ठावर भारताचे अंतराळातील स्थान, क्रीडाक्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरी, रथ यात्रा, आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. 

उद्या सकाळी होणारा मन की बातकार्यक्रम आपण सर्वांनी आवर्जून ऐकावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे.  गेल्या महिन्याच्या मन की बात कार्यक्रमाचे बुकलेट देखील मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. यात भारताचे अंतराळातील स्थान, क्रीडाक्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरी, रथ यात्रा, आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

असे ट्वीट पंतप्रधानांनी केले  आहे.

***

S.Kakade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1846548) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam