गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांना दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
                    
                    
                        
“सीआरपीएफने मोठ्या पराक्रमासह देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी विशेष योगदान दिले आहे, त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा शौर्याचा वैभवशाली इतिहास देखील निर्माण केला आहे”
“सीआरपीएफच्या स्थापना दिनानिमित्त मी जवानांचे अभिनंदन करतो आणि देशाप्रती असलेला त्यांचा सेवाभाव आणि समर्पणाला सलाम करतो”
                    
                
                
                    Posted On:
                27 JUL 2022 2:32PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 27 जुलै 2022
 
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त दलातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ट्वीट संदेशात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, सीआरपीएफने मोठ्या पराक्रमासह देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी विशेष योगदान दिले आहेच, पण त्याचबरोबर या दलाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा शौर्याचा वैभवशाली इतिहास देखील निर्माण केला आहे. सीआरपीएफच्या स्थापना दिनानिमित्त मी दलाच्या जवानांचे अभिनंदन करतो आणि देशाप्रती असलेला त्यांचा सेवाभाव आणि समर्पणाला सलाम करतो. 
तत्कालीन राज प्रतिनिधी पोलीस दल म्हणून 27 जुलै 1939 रोजी या दलाची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 28 डिसेंबर 1949 रोजी संसदीय कायद्यान्वये या दलाचे केंद्रीय राखीव पोलीस दल असे नामकरण करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय गृह मंत्री वल्लभभाई पटेल यांनी नव्याने स्वतंत्र झालेल्या भारत देशाच्या बदलत्या गरजांनुसार या दलाच्या विविधांगी भूमिकेची संकल्पना केली होती.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1845313)
                Visitor Counter : 275