रेल्वे मंत्रालय
‘आझादी की रेल गाडी और स्टेशन्स’ सोहळ्याची सांगता 23 जुलै 2022 रोजी
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी साधणार संवाद
सर्व रेल्वे विभागांचा सोहळ्यात समावेश
Posted On:
21 JUL 2022 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2022
भारतीय रेल्वे 23 जुलै 2022 रोजी ‘आझादी की रेल गाडी और स्टेशन्स’ या विशेष साप्ताहिक सोहळ्याचा सांगता समारोह आयोजित करणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. कार्यक्रमात ते स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील.
आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वेने 18 जुलै ते 23 जुलै दरम्यान ‘आझादी की रेल गाडी और स्टेशन्स’ या आठवडाभर चालणाऱ्या उत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमादरम्यान, 75 चिन्हांकीत स्थानकांचे / 27 रेल्वे गाड्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व दर्शवण्यात येणार आहे.
सांगता समारोहात सर्व क्षेत्र / विभाग त्यांच्या नामांकित स्थानकाद्वारे (सर्व 75 स्वातंत्र्य स्थानक ) दूरदृश्य प्रणाली मार्फत जोडले जातील. सर्व महाव्यवस्थापक दूरदृश्य प्रणालीमार्फत कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या संदर्भात, रेल्वे बोर्डाने यापूर्वीच सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे.
कार्यक्रमाचे सर्व क्षेत्र/ विभागांमध्ये त्यांच्या नामांकित स्थानकाद्वारे (सर्व 75 स्वातंत्र्य स्थानक) थेट प्रसारण करण्यात येईल.
* * *
S.Thakur/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843450)
Visitor Counter : 166
Read this release in:
English
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Urdu
,
Kannada
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam