गृह मंत्रालय

युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले भारतातील पहिले शहर अहमदाबादचा टाइम मॅगझिनच्या 2022 मधील जगातल्या सर्वोत्तम स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले देशवासीयांचे अभिनंदन


युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या श्रेणीतील अहमदाबाद या शहराचा आता टाइम मॅगझिनच्या 2022 मधील जगातल्या सर्वोत्तम स्थळांच्या यादीत समावेश होणे हा देशवासीयांसाठी,विशेषतः गुजरातच्या नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001पासून राबवलेल्या दूरदर्शी विचारांचे हे फलित आहे, ज्यामुळे गुजरात मध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा पाया घातला गेला. साबरमती रिव्हरफ्रंट असो किंवा अहमदाबादमधील सायन्स सिटी असो, नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील पायाभूत सुविधा निर्माण करायला आणि भारताचे भविष्य घडवायला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

Posted On: 14 JUL 2022 11:47AM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी, युनेस्कोच्या जागतिक वारसा शहराच्या श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले भारतातील पहिले शहर अहमदाबादचा  टाईम मॅगझिनच्या 2022 मधील जगातल्या सर्वोत्तम स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.

अमित शाह यांनी ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे की “युनेस्कोच्या  जागतिक वारसा शहराच्या श्रेणीतील अहमदाबाद या शहराचा आता टाइम मॅगझिनच्या 2022 मधील जगातल्या सर्वोत्तम स्थळांच्या यादीत समावेश होणे हा देशवासीयांसाठी, विशेषतः गुजरातच्या नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. सर्वांचे अभिनंदन!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001पासून राबवलेल्या दूरदर्शी विचारांचे हे फलित आहे,ज्यामुळे गुजरात मध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा पाया घातला गेला. साबरमती रिव्हरफ्रंट असो किंवा अहमदाबादमधील सायन्स सिटी असो, नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील पायाभूत सुविधा निर्माण करायला  आणि भारताचे भविष्य घडवायला  नेहमीच प्राधान्य  दिले  आहे, असे अमित शाह म्हणाले.

***

S.Thakur/B.Sontakke/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841424) Visitor Counter : 288