पंतप्रधान कार्यालय
‘माझे मित्र, आबे सान' – पंतप्रधानांनी सामाईक केला शिंझो आबे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेला लेख
Posted On:
08 JUL 2022 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेला लेख सामाईक केला आहे.
एका ट्विट शृंखलेमध्ये पंतप्रधान म्हणाले:
"आबे यांच्या निधनाने जपान आणि जगाने एक महान दूरदर्शी नेता गमावला आहे. आणि, मी एक प्रिय मित्र गमावला आहे.
माझे मित्र आबे सान यांना श्रद्धांजली..."
"मी 2007 मध्ये आबे सान यांना पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हापासून, आमच्यात अनेक संस्मरणीय संवाद झाले आहेत. मी तो प्रत्येक संवाद हृदयात जतन करणार आहे. आबे सॅन यांनी भारत-जपान संबंधांना उर्जा दिली. नवा भारत आपल्या विकासाला गती देत असताना या प्रवासात जपान सोबत आहे हे त्यांनी सुनिश्चित केले. "
"जागतिक नेतृत्वासंदर्भात बोलायचे झाले तर, आबे सान त्यांच्या काळाच्या पुढे होते. क्वाड, आसियान -नेतृत्वातील मंच, हिंद प्रशांत महासागर क्षेत्र उपक्रम , आशिया-आफ्रिका विकास मार्गिका आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती या सर्वांना त्यांच्या योगदानाचा लाभ झाला."
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840246)
Read this release in:
Tamil
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Odia
,
Telugu
,
Urdu
,
English
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam