पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी बेंगळुरू इथल्या बॉश स्मार्ट कॅम्पसच्या उघटनप्रसंगी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून केले संबोधित


तंत्रज्ञान आणि नवोन्मेषात याहून अधिक गुंतवणूक करणे महत्वाचे

भारताचा विकास अधिक हरित  होत आहे

आमच्या डिजिटल इंडिया  मोहिमेचा दृष्टिकोन केंद्र सरकारच्या प्रत्येक पैलूत असलेला तंत्रज्ञानाचा अंतर्भाव  हा आहे. मी सर्वाना या संधीचा लाभ घेण्याचे आणि आमच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो.

आज बॉश ही जितकी जर्मन कंपनी आहे तितकीच ती भारतीय देखील आहे. जर्मन अभियांत्रिकी आणि भारतीय ऊर्जा यांच्या समन्वयाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Posted On: 30 JUN 2022 12:46PM by PIB Mumbai

 

बॉश इंडियाच्या भारतातील कार्यकाळाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित केले.

बॉश इंडियाच्या भारतातील कार्यकाळाला  100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचे  अमृत महोत्सवी वर्ष असल्याने या सोहळ्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे असे त्यांनी नमूद केले. याच कार्यक्रमात बॉश स्मार्ट कॅम्पसचे उदघाटन देखील  करण्यात आले. भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी  भविष्यातील उत्पादने आणि सेवा विकसित करण्यात हा कॅम्पस नक्कीच अग्रस्थानी राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला, जर्मनीच्या चॅन्सलर  मर्केल यांच्यासोबत ऑक्टोबर 2015 मध्ये बेंगळुरू येथील बॉश सुविधा केंद्राला दिलेल्या भेटीचे स्मरण  पंतप्रधानांनी केले.

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे असे सांगून  कोरोना महामारीच्या काळात तंत्रज्ञानाचे लाभ  अधोरेखित झाल्याचे आणि म्हणूनच तंत्रज्ञान आणि नवोन्मेषात याहून अधिक गुंतवणूक करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. बॉश कंपनीने नवोन्मेष आणि अभिनवतेचे परिमाण या क्षेत्रात केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली तसेच शाश्वततेची गरज अधोरेखित केली. भारताने गेल्या आठ वर्षात  सौरऊर्जेची स्थापित क्षमता 20 पटींनी वाढवली असून भारताचा विकास आता अधिक हरित होत आहे, असे त्यांनी सांगितले. बॉश कंपनीने भारतात आणि इतर देशांमध्ये कार्बन उत्सर्जनात संतुलन राखल्याबद्दल पंतप्रधानांनी  कौतुक केले.

भारत आज झपाट्याने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांमधील एक देश आहे, गेल्या दोन वर्षात गुंतवणुकीने मोठी झेप घेतली आहेआमच्या तरुणांना धन्यवाद, आमची स्टार्ट-अप परिसंस्था  जगातील सर्वात मोठी आहे. तंत्रज्ञानाच्या जगातच खूप संधी आहेत. असे पंतप्रधान म्हणाले. देशातील प्रत्येक खेड्याला जलद गती इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकार कार्य करत आहे. आमच्या डिजिटल इंडिया  मोहिमेचा दृष्टिकोन केंद्र सरकारच्या प्रत्येक पैलूत असलेला तंत्रज्ञानाचा अंतर्भाव  हा आहे. मी सर्वाना या संधीचा लाभ घेण्याचे आणि आमच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो. 

या महत्वपूर्ण प्रसंगी, पंतप्रधानांनी बॉश ला भारतात अधिक कार्य करण्यावर चिंतन करण्याचे आवाहन केले. येत्या 25 वर्षात तुमची टीम अधिक काय करू शकते याचे उद्दिष्ट निश्चित करा , 100 वर्षांपूर्वी बॉश ही कंपनी जर्मन कंपनी म्हणून भारतात आली. पण आज,बॉश ही जितकी जर्मन कंपनी आहे तितकीच ती भारतीय देखील आहे. जर्मन अभियांत्रिकी आणि भारतीय ऊर्जा यांच्या समन्वयाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही भागीदारी अधिक मजबूत होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा  समारोप केला.

***

Jaydevi PS/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1838210) Visitor Counter : 127