भारतीय निवडणूक आयोग
उपराष्ट्रपती पदासाठी 2022 मध्ये होणारी निवडणूक (16 व्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया)
Posted On:
29 JUN 2022 7:27PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 68 नुसार, विद्यमान उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी, या पदावर नवीन व्यक्तीच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य आहे. यासंदर्भात, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाची बैठक झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक या बैठकीत निश्चित करण्यात आले.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952 मधील विभाग (4) च्या उपविभाग (1) मधील बाबींना अनुसरून निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेला कार्यक्रम परिशिष्ट-1 मध्ये दिला आहे.
आवश्यकता भासल्यास 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होईल. अधिसूचना 5 जुलै 2022 ला काढण्यात येईल तर 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
आता होणार असलेल्या उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीसंदर्भातील सर्व माहिती तसेच यापूर्वी 15 उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुका, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा : https://eci.gov.in/vice-presidential-election2022/index/
या संदर्भातील माहिती पुस्तिकेची प्रत आयोगाच्या विक्री विभागात प्रत्येकी 25 रुपये देऊन मिळू शकेल.
ANNEXURE-I
Election to the Office of the Vice-President of India, 2022 (16th Vice-Presidential Election)
(i)
|
Issue of Election Commission’s notification calling the election
|
5.07.2022
(Tuesday)
|
(ii)
|
Last date of making nominations
|
19.07.22
(Tuesday)
|
(iii)
|
Date for the Scrutiny of nominations
|
20.07.2022
(Wednesday)
|
(iv)
|
Last date for the withdrawal of candidatures
|
22.07.2022
(Friday)
|
(v)
|
Date on which a poll shall, if necessary, be taken
|
06.08.2022
(Saturday)
|
(vi)
|
Hours of poll
|
10am to 05pm
|
(vii)
|
Date on which counting, if required, shall be taken
|
06.08.2022
(Saturday)
|
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838055)
Visitor Counter : 6000
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam