पंतप्रधान कार्यालय
जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली युरोपियन युनियनच्या अध्यक्षांची भेट
Posted On:
28 JUN 2022 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी जर्मनीतील श्लोस एकमाऊ येथे युरोपियन समितीच्या अध्यक्ष श्रीमती उर्सुला वॉन डेर लेयेन यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एप्रिल 2022 मध्ये रायसीना चर्चे दरम्यान राष्ट्राध्यक्ष वॉन डेर लेयेन यांच्या दिल्ली येथील फलदायी भेटीचे स्मरण केले. भारत आणि युरोपियन संघटने दरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि जी आय करारांबाबतच्या वाटाघाटी पुन्हा सुरु झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
भारत आणि युरोपियन संघटनेच्या डिजिटल सहकार्य, हवामान कृती, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यासह विविध क्षेत्रांमधील सहभागाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
दोन्ही नेत्यांनी सध्याच्या जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर देखील विचार विनिमय केला.
* * *
S.Thakur/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837607)
अभ्यागत कक्ष : 234
Read this releasein:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam