पंतप्रधान कार्यालय
जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2022 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2022
जर्मनीत श्लोस एलमाऊ येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेतली.
इंडोनेशिया जी-20 चे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष विडोडो यांचे अभिनंदन केले. भारताच्या जी-20 च्या आगामी अध्यक्षपदाबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही त्यांनी विचारविनिमय केला.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837389)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam