गृह मंत्रालय
येत्या दीड वर्षांत सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये युद्ध पातळीवर 10 लाख लोकांची भर्ती करण्याचे निर्देश दिल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
“युवा शक्ती हाच नव्या भारताचा आधार असून त्यांच्या सबलीकरणासाठी मोदी अविरत काम करत आहेत, येत्या दीड वर्षांत सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये युद्ध पातळीवर 10 लाख रोजगार उपलब्ध करण्याचे मोदी यांचे निर्देश तरुणांना नवी आशा आणि आत्मविश्वास देणार”
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने येत्या दीड वर्षांत सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10 लाख रिक्त पदे युद्ध पातळीवर भरण्याच्या दिशेने पावले उचलली
Posted On:
14 JUN 2022 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षांत सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये युद्ध पातळीवर 10 लाख लोकांची भर्ती करण्याचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
एका ट्वीट मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणाले “युवा शक्ती हाच नव्या भारताचा आधार असून त्यांच्या सबलीकरणासाठी श्री मोदी अविरत काम करत आहेत. येत्या 1.5 वर्षांत सर्व विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10 लाख जणांना युद्ध पातळीवर रोजगार देण्याचे मोदी यांचे निर्देश तरुणांना नवी आशा आणि आत्मविश्वास देईल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार येत्या दीड वर्षांत सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये युद्ध पातळीवर 10 लाख जणांना भर्ती करून रिक्त जागा भरण्याच्या दिशेने केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत.
नए भारत का आधार उसकी युवा शक्ति है, जिसको सशक्त बनाने के लिए मोदी जी निरंतर कार्यरत है।
मोदी जी द्वारा सभी सरकारी विभागों व मंत्रालयों में 1.5 साल में मिशन मोड में 10 लाख भर्ती करने का निर्देश युवाओं में नयी आशा और विश्वास लायेगा।
इसके लिए @narendramodi जी का धन्यवाद करता हूँ। pic.twitter.com/9RdzdTU259
— Amit Shah (@AmitShah) June 14, 2022
In line with instructions of PM @narendramodi to carry out 10 lakh recruitments in all GOI Deptts & Ministries over a period of 1.5 yrs, Ministry of Home Affairs has initiated steps to fill up vacancies in Mission Mode.
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) June 14, 2022
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833829)
Visitor Counter : 205